लोहारा (इकबाल मुल्ला) :-
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिना निमित्त लोहारा शहरातील व तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात दि.15 ऑगस्ट स्वांतत्र्य दिन ध्वजारोहण करुन उत्साहात साजरा करण्यात आला.
लोहारा प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तहसीलदार शोभा पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. पं.स.कार्यालयाचे ध्वाजारोहन गटशिक्षण कार्यालयाच्या प्रांगणात प.स.सभापती सौ.ज्योतीताई पत्रिके यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा नगरपंचायतचे ध्वजारोहन नगराध्यक्षा सौ.पोर्णिमाताई जगदिश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
लोहारा खु येथील लोकमंगल कारखान्याचे ध्वजारोहन युवा नेते रोहन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस ठाण्याचे ध्वजारोहन पो.नि.सर्जेराव भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका कृषी कार्यालयाचे ध्वजारोहन तालुका कृषी अधिकारी एम.बी.बिडबाग यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे ध्वजारोहन सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एस. डी.माले यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील भानुदास महाविध्यालयाचे ध्वजारोहन आ.सतिश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा देवगिरी ग्लोबल अँकडमीचे ध्वजारोहन अभिजीत लोभे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील शंकरराव जावळे जावळे पाटील महाविध्यालय व नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहन प्राचार्या श्रीमती यु.व्ही.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल चे ध्वजारोहन सैनिक(फौजी) प्रकाश मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर, अव्वल कारकुन अशोक शिंदे,बालाजी चामे,तलाठी जगदिश लांडगे,पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे, नगरसेवक शाम नारायणकर,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकरराव जावळे पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील,अविनाश माळी,हरी लोखंडे,के.डी.पाटील,दिपक प्रकाश रोडगे,दिपक वैशाख रोडगे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हाजी बाबा शेख,प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी,प्राचार्य बी.बी.मोटे,प्राचार्य शहाजी जाधव,संचालीका सविता जाधव,प्राचार्या श्रीमती यु.व्ही.पाटील,पं.स.सदस्य वामन डावरे,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर परसे,पत्रकार निळकंठ कांबळे,बालाजी बिराजदार,सतिश सुर्यवंशी, गिरीश भगत,कारख्याचे एम.डी.प्रशांत पाटील,अजित ढोणे,लिंबराज साळुंके,दत्ता जावळे पाटील,यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.