लोहारा (इकबाल मुल्ला) :
लोहारा तालुका भाजपाच्यावतीने शहरात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला.
शहरातील लोकवाचनालयात वाढदिवसानिमित्त शहरातील गरीब गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विक्रात संघशेट्टी,तालुका सरचिटणीस सुभाष गिरी,प्रशांत लांडगे,राज शेखर माणिक शेट्टी,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण,प्रमोद पोदार,विजय महानुर,शहराध्यक्ष अशोक तिगाडे,ओबीसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, विद्यार्थ्यी अाघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर,परमेश्वर कदम,संतोष कुंभार,दयानंद फरिदाबादकर,मल्लिनाथ फावडे,दयानंद शेवाळे,दगडू तिगाडे,यांच्यासह शहरातील व तालुकयातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित होते.