बार्शी (गणेश गोडसे) :-
पाऊस नसल्यामुळे बार्शी तालुक्यात निर्माण झालेली पिक स्थिती, पाणी टंचाई व करपुन गेलेल्या पिकांची पहाणी करूण त्याचे पंचनामे करूण बार्शी तालुका टंचाई ग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी चारे ता.बार्शी येथील शेतक-यांसह बार्शी तालुक्यातील शेतक-यांनी एका लेखी निवेदनाद्वारे बार्शी तहसिल कार्यालयाकडे केली आहे.
तहसिलदार यांच्या कडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे कि, खरीप हंगाम 2018-19 मध्ये जुन च्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी झाली. या हंगामात बार्शी तालुक्यात उडीद, मुग, सोयाबीन, मका, तुर, सुर्यफुल, भुईमुग यासह ईतर पिकांची पेरणी केली.चालु खरिप हंगामाची चालु स्थिती ही टंचाई ग्रस्त आहे.जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संपुर्ण जुलै महिणा व चालु ऑगस्ट महिण्यातील पहिले दहा दिवस पुर्णतः कोरडे गेले आहेत.पेरणी झाल्यापासुन 35 ते 50 दिवस जमीण ओलीही झालेली नाही.
संपुर्ण जुलै सह ऑगस्ट महिण्याचा प्रारंभीचा काळ हा फक्त ढगाळ अवस्थेत गेला आहे. मात्र सध्या उन्हाची तिव्रता वाढलेली असल्यामुळे पिके करपुन गेली आहेत.उपलब्ध पाणीसाठे संपले असुन तालुका महसुल विभागाच्या वतीने तातडीने पिकांचे पंचनामे करूण शेतक-यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तानाजी जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, विलास जगदाळे, प्रकाश बोधले,धनंजय गोरे,मिटु जाधव यांच्या सह 200 शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत.