बार्शी (गणेश गोडसे) :-
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हेगाराविरूद्ध कारवाई करत एका महिलेसह पाच खंडणीबहाद्दरावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे बार्शी शहर व तालुक्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. बाशी शहर पोलीसांनी संघटित गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाईचा बडगा उचलुन पाच जणांवर मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील दोघा खंडणीबहाद्दरासह बार्शी शहर व तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. 
नेश्वर उर्फ बप्पा सुरेश लावंड (वय ३१ रा. फुले प्लॉट,बार्शी), उमेश चंद्रकांत मस्तुद (वय ३३, रा.सुभाषनगर बार्शी), रंजना तानाजी वणवे (वय ४१, रा.टी.सी. कॉलेज पाठीमागे बारामती जि. पुणे), अनिल सुधाकर शिदे (रा.साकत ता.बार्शी) व नितीन उर्फ सोमा अंकुश सोनवणे (वय २०, रा.बेलवाडी ता.इंदापूर जि.पुणे) अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
बाबत अधिक माहिती अशी कि, गत महिन्यात बार्शी शहरातील नंदकुमार रामलिंग स्वामी याचे पैशासाठी अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आली होती.त्यानंतर स्वामी याने अपहरणाबाहत दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरोधात बार्शी शहर पोलीसांत अपहरण करूण मारहाण करत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात  आला होता. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींवर बार्शी, पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत.शहर पोलिसात दाखल झालेल्या अपहरण व खंडणीप्रकरणी पोलीसांनी चौघांच्या अटक केले असून चौघे सध्या सोलापूर येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत.मात्र यामधील आरोपी अनिल शिंदे हा अजुनही फरार आहे.
     कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई केली.जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील,सहा.पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक संदिप जोरे, एस.बी.सुरवसे, रेवनाथ भोंग, अमोल माने, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top