बार्शी (गणेश गोडसे) :-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पांगरी ता.बार्शी येथील शिवछत्रपती विद्या मंदिर प्रशालेच्या आठवी व पाचवी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. प्रशालेचा संदेश अरूण क्षिरसागर याने ग्रामीण विभागातुन सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. प्रशालेतील इयत्ता पाचवीच्या कु.स्वरांजली संजय वाकडे हिनेही शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केले आहे. यश मिळवल्याबद्दल प्रशालेच्या संस्थापिका सौ.मंदाताई काळे,मुख्याध्यापिका ज्योत्सना डोके यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top