बार्शी (गणेश गोडसे) :-
दुग्धोत्पादनासाठी सत्तर रुपये खर्चुन घेतलेली म्हैस अचानक खानेपिने सोडते...गोठ्यातली जागा सोडण्याचे नाव नाही...पोट फुगुन अवाढव्य झालेले.बाहेर पडलेली जिभ,जिवाच्या आकांताने व वेदना सहन होत नसल्यामुळे केविलवाण्या स्वरात ओरडण्याचा प्रयत्न करणारी म्हैस... हे दृष्य पाहुन अवाक् झालेला शेतकरी. हे चित्र होते पांगरी ता.बार्शी येथील शंकर धर्मराज कांबळे या शेतक-याच्या शेतामधील गोठ्यातील. जिव लावलेले मुके जितराब असे अचानक आजारी पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.आपल्या पाळीव म्हशीला काय झाले यामुळे चिंतातुर झालेल्या शेतक-याने धावपळ सुरू करून पशुवैद्यकिय अधिका-यास याची माहिती दिली. 5 वर्ष वयाची मु-हा जातीची म्हैस त्यांनी एक वर्षापूर्वी विकत घेतली होती.सध्या तिचे 3 रे वेत असुन 8 वा महिना आहे.
प्रारंभी म्हसीने खाणे सोडले त्यामुळे वैद्यकीय अधिका-यास बोलावुन घेऊन म्हसीची तपासणी करण्यात आली.मात्र तो उपचार लागु पडला नाही. म्हैस रवंथ करत नसल्याने पशुवैद्यकिय अधिका-यांनी हेरून म्हसीने पचन न होणारी एखांदी वस्तु खाल्ली अथवा श्वसन नलिकेत कांहीतरी अडकले असावे असे निदान करण्यात आले. वैराग केंद्राचे डॉ. प्रमोद मांजरे यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर ते आपल्या पथकासह पांगरी येथील झानपुर रस्त्यावरील कांबळे यांच्या कोठ्यावर पोचले.पाहणीनंतर व प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर डॉ. मांजरे यांनी तातडिने म्हसीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करून म्हसीच्या श्वसन नलिकेत अडकलेला अर्धा किलो पेक्षाही जास्त वजनाचा ताडपत्रीचा गोळा काढण्यात आला. गोळा काढुण शेवटचा टाका घेताच शेवटच्या घटका मोजत असलेल्या म्हैस जागेवर उठुन उभी राहीली. शस्त्रक्रिये नंतर म्हैस उठुन उभी राहील्यामुळे कुंटुबातील सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला.