बार्शी (गणेश गोडसे) :-
भा.क.प. पक्षाच्या वतिने बार्शी तहसिल कार्यालयासमोर भाजपा-मोदी हटाओ देश बाचाओ यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
भाकपचे राज्य कौ. सदस्य, प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेत्वृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आयटकच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल श्रमिक संघ, ब.न.पा कंत्राटी कामगार संघ, सोलापूर विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, अ. भा.किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम.एस. कुलबर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुन्याचा शोध घेऊन, या खुण्याच्या मागे असणर्या शक्तींचा शोध लावून त्यांना तातडीने कायद्याने कठोर शासन करा, कंत्राटीकरण तातडीने थांडबून कामगारांना कायम सेवेत घ्या, सार्वजनिक धंद्यांचे कंत्राटीकरण, खाजगीकरण तातडीने थांबवा, कामागार भरती करून बेरोजगारी तातडीने संपवा, किमान वेतन 18 हजार रूपये करा, सर्व कामगारांना ई.एस.आय. प्राव्हीडंन्ट फंड याचे फायदे द्या, वाढत्या महागाईला आळा घाला, पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्य, डाळी, तेल इत्यादींची केलेली दरवाढ रद्द करा, स्वयंपाक गॅसची किंमत तातडीने कमी करा, भाजपाने जाहिर केलेली 15 लाख रूपये सर्व नागरिकांच्या खात्यात जमा करा, शिक्षणाचे भगवेकरण, कंत्राटीकर, कंपनीकरण, खाजगीकरण तातडीने थांबवा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या त्वरित खात्यावर जमा करा, भ्रष्टाचारास आळा घाला, परदेशात असणारा काळा पैसा भारतात तातडीने आणुन त्याचा हिशोब जनतेस सादर करा, भारतातून जनेचा पैसा घेवून गेलेले भांडवलदार यांना तातडीने अटक करून भारतात आणा, नोटबंदीचा किती नोटा जमा झाल्या याचा हिशोब जनतेस सादर करा, 2000 नोट रद्द करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, रेशन मार्फत सर्वांना कमी दरात धान्याचा पुरवठा करून अन्न सुरक्षा द्या, आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण तातडीने थांबवा, कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट भावाची कायदेशीर हमी द्या, स्वस्त दरात शेती औजारे उपलब्ध करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, सर्व दुष्काळगस्त शेतकर्यांना पीक विमा द्या, वनाधिकार कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, शेतकरी व शेतमजूरांना वयाच्या 60 वर्षानंतर 5 हजार रूपये पेन्शन द्या, शेतीसाठी पुर्ण दाबाने मोफत विज पुरवठा करा, समाजात धर्मीक, जातीय व सामाजीक तेढ निर्माण करणार्या व्यक्तींना कठोर शासन करा, सातवा वेतन आयोग लागू करा, पाच दिवसांचा आठवठा करा, निवृत्ति वय 60वर्ष करा, सरकारी, निमसरकारी, शिक्षेकतर पदे त्वरीत भरा, सर्व सरकारी, निमसकारी, शिक्षकेतरांना 2005 आगोदरची जुनी पेन्शन चालू करा, शिक्षकेतरांना पदोन्नती द्या आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.