नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक  मुश्ताक कुरेशी  हजयात्रेसाठी नळदुर्ग हुन मक्का मदिना साठी रवाना झाले आहेत. त्यानिमित्ताने शहरवासीयांच्यावतीने त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले.
    नळदुर्ग नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मुश्ताक कुरेशी दुसऱ्यांदा हज करण्यासाठी शनिवार 11ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नळदुर्गहुन रवाना झाले.त्यावेळी मोठ्या प्रमाणात मित्र,परिवार व शुभचिंतक उपस्थित होते. त्यापुर्वी काल 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मित्र परिवार च्यावतीने बि.के.फंक्शन हॉल मध्ये त्यांच्या साठी हजसाठी जात असल्याने सत्कार समारंभाचे करण्यात आले होते. यावेळी नळदुर्ग शहरातील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिकक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित लोकांसाठी त्यांच्या परिवाराच्यावतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.  या करेशी फँमिलीचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत त्यांच्या घरातून हजसाठी त्यांचे आई,वडील, त्यांच्यासह पाच भाऊ,चार बहिणीसह परिवारातील विविध सदस्य हजसाठी गेले आहेत. यावेळी त्यांची पत्नी देखील त्यांच्या सोबत हजसाठी रवाना झाले आहेत.

 
Top