बार्शी (गणेश गोडसे) :- 
पिंपरी (सा) ता. बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी यशवंत काटमोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जयवंत काटमोरे यांच्या अपघाती निधनाने गेल्या काही महिन्यापासून उपसरपंच रिक्त होते. 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पिंपरी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदासाठी यशवंत काटमोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.स्व,जयवंत दादा काटमोरे यांचा आशीर्वाद व त्यांनी केलेली विकासकामे व जनमानसातील निर्माण केलेली ओळख ,आपुलकी व निर्माण केलेल्या विकासरूपी पाऊल खुणा यांचा आदर्श घेऊन मा यशवंत भैया काटमोरे यांनी उपसरपंच पदाची आज सूत्रे हातात घेतली व भविष्यात देखील गावच्या विकासाची कामे करून दादांना श्रद्धांजली वाहणार असे नवनियुक्त उपसरपंच यांनी आश्वासन दिले. निवडप्रक्रिया उपाध्ये.एन.व्ही,पिचके.एन.एम,ग्रामसेवक कांबळे.डी. के यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील जेष्ठ मंडळी,मित्र परिवार व पिंपरी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

 
Top