बार्शी (गणेश गोडसे) :-
एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअर्लग अॅण्ड रिसर्च, बार्शी या महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) दिल्ली यांचे सभासदत्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत सदर सोसायटीचे राष्ट्रीय स्तरावर एक लाखापेक्षा जास्त वैयक्तिक सभासद आहेत.
या सभासदत्वामुळे प्राध्यापकांच्या संशोधकवृत्तीला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहेसोसायटीच्या माध्यमातुन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम (STTP) आयोजित केले जाणार आहेत त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील संशोधक वृत्तीला अधिक वाव मिळणार आहे. तसेच महाविद्यालयातील प्राध्यपकांना व विद्यार्थ्यांना त्यांचे शोध निबंध अत्यल्प दरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करता येणार आहेत आणि सोसायटीच्या मान्यताप्राप्त किंवा प्रायोजक अशा चर्चासत्रे, कार्यशाळा आणि इतर कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी प्राधान्य मिळणार आहे.
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली यांचे सभासदत्व महाविद्यालयाने मिळविल्याबद्दल माईस, एम.आयटी संस्थेच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, मार्गदर्शक डॉ. सुभाष आवळे यांनी प्राचार्य डॉ. अतुल आयरे तसेच सर्व प्राध्यापकांचे व विद्यायचे अभिनंदन केले.