बार्शी (गणेश गोडसे) :-
आश्रमशाळेतील मृत मुलाचे प्रकरण मिटविण्यासाठी आश्रमशाळेच्या संस्थापकाकडे आपण पत्रकार व भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचा सदस्य असल्याचे खोटे सांगुन दहा लाख रुपयांची खंडणी मागणा-या अकलुज येथील एका तोतया पत्रकाराविरूद्ध पांगरी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव लोखंडे रा.अकलुज ता.माळशिरस.जि.सोलापूर असे खंडणी मागितल्याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
प्रभाकर गणपत डमरे, वय-58 रा.खामगाव ता.बार्शी या संस्थापकांनी याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, ते प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, खामगाव येथे सन 1994 पासुन संस्थापक म्हणून काम पाहतात.प्राथमिक आश्रम शाळेत 120 निवासी मुले व मुली आहेत. मुख्याध्यापक म्हणुन दिलीप तांबडे काम पाहतात.सुमारे 2 वर्षापुर्वी शाळेतील मुलगा उत्तरेश्वर भिमराव हजारे रा. शिरूर ,ता केज,जि बीड हा शेत तळ्यात पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला होता.त्यावेळी त्यांचे संदर्भात रितसर पोलीस ठाणेस नोंदही करण्यात आला आहे.
दि.3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा चे सुमारास ते घरी असताना त्यांचे प्राथमिक आश्रम शाळेतील मुख्याध्यापक दिलीप नानाभाऊ तांबडे यांनी त्यांना फोन करून कळवले की केशव लोखंडे (पुर्ण नाव माहीत नाही) रा.अकलुज हा शाळेत येऊन एका विद्यार्थ्यांस इयत्ता 6 वी मध्ये शाळेत प्रवेश देता का असे विचारत आहे.तेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांना शाळा सुमारे 2 महिन्यापासुन सुरु झाली आहे आता नविन प्रवेश देता येत नाही असे सांगितले.तेव्हा लोखंडे याने मी पत्रकार व भष्टाचार निर्मुलन संस्थेचा सदस्य आहे,तुमचे शाळेतील 2 वर्षांपूर्वी तळ्यात बुडून मयत झालेल्या मुलाचे प्रकरण उकरून काठीण आणि तुमच्या संस्थेची बदनामी करीन असे म्हटले. जर तुम्ही मुलास प्रवेश न दिल्यास मी उपोषनास बसेन आणि तुम्ही मला जर 1000,000- रुपये दिले तर मी मेलेल्या मुलाचे प्रकरण असेच दाबुन ठेवेन असे म्हणुन दमदाटी करून तुमचा मोबाईल नंबर घेवुन गेला आहे असे मुख्याध्यापकाने फोनद्वारे कळवले. त्यानंतर सायंकाळी 05/41 वाजता केशव लोखंडे याने फोन करूण तुमच्या शाळेवर सकाळी आलो होतो असे सांगितले.तुमचे शाळेतील 2 वर्षापुर्वी तळ्यात बुडून मयत झालेल्या मुलाचे पंचनामा व पी.एम.रिपोर्ट का देत नाही ते दोन दिवसात माझे व्हाटसअॅप वर पाठवा. तुम्ही सदरचे प्रकरण पैसेचे व राजकारणाचे जोरावर दाबले आहे. त्यावर फिर्यादीने संबंधितास रितसर तुम्ही पोलीस स्टेशमधुन माहीती घ्या असे सांगितले.
त्या नंतर लोखंडे याने त्याच्या मोबाईल वरूण त्याने कोठेतरी या पुर्वी अंदोलन केलेल्या दोन व्हीडीओ क्लिप पाठवल्या व फोन करून मी तुम्हाला अंदोलन केलेल्या दोन व्हीडीओ क्लिप पाठवल्या आहेत.त्यावरून मुलाचे प्रकरण मिटवुन घेण्यासाठी मला तुम्ही 1000,000/- रुपये या नाही तर मी समाज कल्याण ऑफिस समोर आंदोलने करून शाळा बंद पाडीन अशी धमकी दिली. डमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोतया पत्रकार लोखंडे याच्या विरोधात पांगरी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष बडे हे करत आहेत.