तुळजापूर :- बारुळ ता. तुळजापूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे गावातून मिरणुक काढण्यात आली.   यावेळी लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य  महेंद्र  धुरगुडे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेच पुजन करून मिरवणूकीला सुरवात झाली.  महेंद्र  धुरगुडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

जयंती समितीच्या वतीने . महेंद्र  धुरगुडे यांचा सत्कार करण्यात आला.   यावेळी सरपंच शहाजी सुपनार , लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपसरपंच रणदिवे, माजी सरपंच सुभाष पाटील, किसन देडे, नभी चाचा शेख, संजय ठोंबरे, दिपक वट्टे, राजाभाऊ वट्टे, सुनील सगट, सुरज सगट, भास्कर सगट आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top