युनूस शेख
नळदुर्ग :- शुक्रवार दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ब्रेन डेड नंतर अवयदान केलेल्या युनूस शेख यांना सर्वपक्षीय व सर्वधर्मीय सामुदायिक श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती नगरसेवक विनायक अहंकारी यांनी दिली. 

नळदुर्गचे रहिवाशी व जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक युनूस शेख यांचे मंगळवार रोजी अपघातात गंभीर जखमी झाले होते. सोलापुर येथील अश्विनी रुग्णालयात ब्रेन डेड नंतर युनूसचे अवयदान करण्यात आले. नगरसेवक अहंकारी यांनी सांगितले की, घरचा कर्ता माणूस गेल्यावर खरतर ते कुटुंब उध्दवस्त होत असते. पण शेख कुटुंबियांनी युनूस यांच्या अवयवांचे दान करण्याचा मोठा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे पाच जणांना नवसंजीवनी व नवीन आयुष्य मिळाले आहे. शेख कुटुंबियांचा हा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी आहे. म्हणून युनूस शेख व त्यांच्या कुटुंबीयांच्या ह्या त्यागाला सलाम करण्यासाठी व युनुस शेख यांना सर्वपक्षीय व सर्व धर्मीय सामुदायिक श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अहंकारी यांनी केले आहे.
 
Top