काटी  :-  तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील सरपंच  आदेश  कोळी यांच्या  अध्यक्षते ग्रामसभा  खेळीमेळीच्या वातावरणात  संपन्न झाली.  प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने दिवंगत  माजी  पंतप्रधान   अटलबिहारी वाजपेयी  यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  त्यानंतर  ग्रामसेवक सतिश  शिंदे  यांनी  मागील  सभेचा इतिवृत्तांत  वाचून  दाखवला. अत्यंत  खेळीमेळीच्या वातावरणात  संपन्न  झालेल्या  या ग्रामसभेत   शासनाच्या विविध  योजनांसाठी  लाभार्थ्याची निवड,  अतिक्रमण  नियमाकुलबाबत केलेल्या  कार्यवाहीचा आढावा,   विविध  योजनेतील  घरकुलचा भौतिक आढावा आदी विविध  ठराव  पारित करण्यात आले.

या ग्रामसभेत विद्यमान सरपंच  आदेश  कोळी यांनी ग्रामपंचायतची सुत्रे हाती घेतल्यापासून करण्यात  आलेल्या  विकासकामाचा पाढा वाचून  दाखवला.  यामध्ये  प्रामुख्याने गावासाठी  पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 35 लाखांचा निधी मंजूर,  गावांतर्गत  5 हायमास्ट  दिव्यासाठी  साडेसात लाख,  जिल्हा परिषद  माध्यमिक व  प्राथमिक,  केंद्रीय  कन्या  शाळेसाठी  व ई लर्निगसाठी तीन  लाख, अंगणवाडी  8 युनिटसाठी  अॅरोकिटची व्यवस्था,  गावात संपूर्ण  दारुबंदीसाठी पाठपुरावा,  आदी विविध  कामे मंजूर  करण्यात आली आहेत . तर काही कामे प्रगती पथावर असून  यापुढेही  गावाच्या  विकासाचा आलेख असाच चालू  ठेवणार  असल्याचे सरपंच  कोळी यांनी  आवर्जून सांगितले.

शेवटी    तंटामुक्त समितीच्या  अध्यक्ष पदावरुन होणाऱ्या  वादाला फाटा देत   महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी  सर्वानुमते विद्यमान  सरपंच  आदेश  कोळी यांची निवड करण्यात आली .तर उपाध्यक्षपदी  करीम बेग व नजीब काझी यांची फेरनिवड  करण्यात आली. तंटामुक्त समितीच्या  निवडीनंतर  उपस्थित  मान्यवरांच्या  हस्ते  नुतन अध्यक्ष  आदेश  कोळी व उपाध्यक्ष  बेग व काझी यांचा सत्कार करण्यात आला.

             यावेळी  उपसरपंच  सौ. शामलताई हंगरगेकर,  माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, सुर्यभान हंगरगेकर,   सुजित  हंगरगेकर,प्रदीप  साळुंके,  माजी सरपंच  शामराव  आगलावे, करीम बेग, नजीब  काझी,  अतुल  सराफ, बापू वाडकर,  सुहास  साळुंके,  बाबा साळुंके, भैरी काळे, बाळासाहेब  भाले, शशिकांत  साळुंके,  ज्ञानेश्वर  गुरव ,  अखिल  शितोळे आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top