मुंबई :- ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज (दि. 24 ऑगस्ट) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी १२ वाजता मुलुंडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. चव्हाण यांना २०१८ चा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरविण्यता आले होते.
विजय चव्हाण यांची गाजलेली नाटकं
ती तिचा दादला आणि मधला
श्रीमंत दामोदरपंत
मोरूची मावशी
तू तू मी मी
नवरा म्हणू नये आपला
इशी ही फसवा फसवी
विजय चव्हाण यांचे गाजलेले सिनेमे
वहिनीची माया
झपाटलेला
पछाडलेला
नो प्रॉब्लेम
हलाल
हुंटाश
नाना मामा
श्रीमंत दामोदरपंत ( सिनेमा)
चष्मे बहाद्दर
नाथा पुरे आता
भरत आला परत