तुळजापूर :- समाजात नेहमी विरोधी तत्व कार्यरत असतात.समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कांही लोक अशा सामान्य समाजाची पिळवणूक करत असतात आणि म्हणुनच ही पिळवणूक थांबविण्यासाठी, समाजाला ज्ञानी,संस्कारी बनविण्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाचा हा महायज्ञ सुरु केला, असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी केले.
तुळजापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३१ वा स्मृतिदिन संपन्न झाला. या प्रसंगी माजी प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. रमेश दापके, माजी सहसचिव आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की. पुरोगामी महाराष्ट्रात परंपरेचे एक वैशिष्ट्ये म्हणजे ते पुरोगामित्व समाजहिताच्या संस्काराने ओतप्रोत आहे,याच संस्कारांचा प्रचार प्रसार आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अनेक ज्ञानकेंद्रांच्या माध्यमातुन होत आहे,बापूजींनी विशेषतः ग्रामीण भागातील बहुजन दिन दलितांसाठी गरिब व होतकरु विद्यार्थ्यांच्या साठी त्यांना ऊच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.शिक्षणमहर्षी हे एक आदर्श शिक्षक होते ,आपला महाराष्ट्र त्यांच्या या कार्यातुन कधीही ऊतराई होऊ शकणार नाही असे अनमोल विचार त्यांनी या वेळी व्यक्त केले.
या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांच्या जिवनकार्यावर आधारित हिंदी विभागाचे प्रा.डॉ आर. आडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुतारी भित्तीपञिकेचे ऊदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रा.आनंदराव जाधव ,डॉ .देशमुख कोल्हापूर यांनी हि मनोगत व्यक्त केले,प्रा.डॉ .टि.एल.बारबोले यांनी स्वागतपर मनोगत तर प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनि तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने ऊपस्थित होते.प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी सूञसंचलन तर प्रा.धनंजय लोंढे यांनी आभार मानले.