नळदुर्ग :- रामतीर्थ ता. तुळजापूर येथील एका ॲटोरिक्षा चालकाची मुलगी प्रणिता मोहन पवार ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेसाठी बेंगलोर येथे निवड झाल्याने एसबीआय फाऊंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयाने चालू असलेल्या ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत स्कॉलरशिप म्हणून दहा हजार रुपयाची मदत देण्यात आली. पवार हिने गतवर्षी श्रीलंका देशात आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.
    नळदुर्ग येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये प्रणिता पवार शिकत असून दि. 16 ऑगस्ट रोजी बेंगलोर येथ होणा-या 14 वर्ष वयोगटाच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पवार हिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वरील संस्थेच्यावतीने बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ गावातील समाज मंदिरात पवार यास बँकेच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा केल्याची पावती देण्यात आली. 
     यावेळी दिलासा संस्थेचे प्रतिनिधी विलास राठोड, बापू कदम, सरपंच शंकर राठोड, उपसरपंच रामू चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष गुरुदेव राठोड, पोलीस पाटील धनू राठोड, बालाजी राठोड, देविदास पवार, शिवाजी राठोड, विकास पवार, अजित राठोड, शेषेराव राठोड, महिला बचत गटाच्या अध्यक्षा निर्मला राठोड, कांताबाई राठोड, फुलाबाई राठोड, सिताबाई चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
     हा ग्रामसेवा कार्यक्रम एसबीआय फाऊंडेशनचे सहाय्यक व्यवस्थापक राजाराम चव्हाण, दिलासा संस्थेच्या उपाध्यक्षा वैशाली खाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

 
Top