तुळजापूर :- येथील तहसील कार्यालयासमोर वडगाव काटी ता. तुळजापूर येथील महावीर काटकर यांनी वडगाव - होनसळ रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा म्हणून उपोषण सुरू केले असून या उपोषणाणामध्ये बैलगाडी व एका म्हशीचा सहभाग आहे. या उपोषणाला जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी भेट दिली.
या उपोषणाची माहिती घेऊन, उपोषणाच्या ठिकाणाहून धुरगुडे यांनी तहसीलदारांना फोन लावून या उपोषणाची माहिती देऊन याची गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर वडगाव - होनसळ रास्ता तात्काळ करावा असे तहसीलदार व बी.डो.ओ. यांना बोलताना सुचना करुन, तहसीलदार व बी. डी. ओ. यांच्याशी उपोषणकर्ते महावीर काटकर यांची फोन वरुन चर्चा करून दिली.