काटी (उमाजी गायकवाड) :-
केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुस्लिम बांधव सरसावले असून मुस्लिम समाजातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बकरी ईद दिवशी सामुहिक नमाज अदा करुन केरळ मधील पुरग्रस्थांसाठी मदत निधीचे आवाहन करण्यात आले.
केरळ राज्यात पावसाने थैमान घालून अवघे केरळ राज्य पूरामुळे उध्वस्त झाले. करोडोची हाणी झाली, अनेक केरळी बांधव यात मृत्युमुखी पडले, लाखो कुटुंबाचे संसार उध्वस्त होवून रस्त्यावर आली, यासर्वांना मदतीचा हात देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. याभावनेतून मदत निधीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन येथील मुस्लिम बांधवांनी 34841 रुपये जमा करून रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी जमियत-ए-उलेमा हिंदचे तालुका अध्यक्ष मुफ्ती फिरदोस अहमद यांचेकडे निधी सुपूर्त करण्यात आला.यावेळी सर्वांनी केरळमधील पुरग्रस्थांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने आवाहन करण्यात आले.
यावेळी जमियत-ए-उलेमा हिंदचे तालुका अध्यक्ष मुफ्ती फिरदोस अहमद, तनवीर काझी, अहमदखाॅन पठाण, करीम बेग, तबारकअल्ली इनामदार, माजीद इनामदार, वजीर कुरेशी, कय्युम कुरेशी, रफीक कुरेशी, अहमदअल्ली कुरेशी, आयुब कुरेशी, फिरोज पठाण, अमीर पठाण, अहेमद शेख, इमरान शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हिडिओ पहा -
