नळदुर्ग :- पवित्र श्रावण महीना निमित्त खंडोबा मंदिर परिसरातील नागझरी मंदिराची प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीपासून विधिवत पूजा सुरुवात झाली. नळदुर्ग परिसरातील खंडोबा मंदिराजवळ अतिशय जागरत असं नागझरी चे मंदिर हे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला मोठा इतिहास आहे श्रावण महिन्यामध्ये या मंदिराचा पाणी ऐतिहासिक ऐतिहासिक खंडोबा देवाला याच पाण्याने रोज पूजा केली जाते.
येथे असलेला झरा अनेक वर्षांपासून कधीही आटला नाही. असं म्हणतात, जुन्या काळात जेव्हा सगळीकडे दुष्काळ होता तेव्हा सुद्धा या नगरीचे पाणी कधीही ऐकलं नाही यावेळी संपूर्ण नळदुर्ग याच पाण्याने स्वतःची तहान भागवलेली आहे.. आज श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी नगरसेवक विनायक अहंकारी, रत्नाकर घोडके, दिनेश डोंगरे यांनी पूजा केली..