![]() |
संग्रहित छायाचित्र |
नळदुर्ग :- आलियाबाद ता. तुळजापूर येथिल ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात औरंगाबाद विभागातून दुस-या क्रमांकासाठी निवड झाली असून येत्या दि. 15 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद ही ग्रामपंचायत जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच ज्योती चव्हाण, ग्रामसेवक प्रशांत भोसले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने संपूर्ण गाव हांगदारीमुक्त, घर तेथे शौचालय, लोकसंख्येच्या तीन पट झाडे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, जलशुध्दीकरण प्लॅन्ट, संपूर्ण गावात सौर पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, मॅजिक पिट, वाचनालय, स्वच्छ रस्ते, गटार आदी कामे झालेली आहेत.
या ग्रामपंचायतीचे सरंपच, ग्रामसेवक यांना दि. 15 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीची दुस-या क्रमांकासाठी निवड झाल्याबद्दल सरपंच ज्योती चव्हाण, ग्रामसेवक प्रकाश यांच्यासह ग्रा.पं. सदस्य, सर्व ग्रामस्थांचे आमदार मधुकरराव चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी महेश देशमुख, तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, गटविकास अधिकारी ढवळशंख आदींनी अभिनंदन केले आहे.