![]() |
कार्यक्रम पत्रिका |
तुळजापूर :- नगरसेवक सुनिल (पिंटू) रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त व नागपंचमी सणाचे औचित्य साधून खास महिलांसाठी होमिनिस्टर अर्थात "खेळ खेळूया पैठणीचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तुळजापूर येथील खडकाळ गल्ली, देवीच्या मंदीराजवळ या ठिकाणी बुधवार दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री नंदिता उर्फ धनश्री काडगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांच्या हस्ते पारितोषण वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात निर्माता, सिनेअभिनेते रमेश परळीकर हे मराठी-हिंदी गाणी, विनोदी उखाणे, नृत्य, मनोरंजक खेळ व सोबत अनेक कलाविष्कारांचे सादरीकरण करणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक सुनिल रोचकरी मित्रपरिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.