तुळजापूर :- सातवा वेतन आयोग विना विलंब लागू करावा यासह 1 नोव्हे 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेंशन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या राज्यस्तरीय संपात तुळजापूर तालुक्यातील सर्वच शिक्षक सँघटनांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग घेतला. संपाच्या आजच्या तिसऱ्या (दि. 9 ऑगस्ट) दिवशी सर्व संघटनांचे प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन तुळजापूर तहसीलदार याना दिले.
निवेदनात पुढे नमूद केले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून संपात सहभागी होणे हि बाब योग्य नाही याची जाणीव असलेल्या आपण नोव्हेबर 2005 नंतर शासन सेवेत लागलेल्या व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची आज असलेली अवस्था अस्वस्थ करणारी आहे व बेमुदत संम्प करण्यास भाग पडणारी आहे याचा विचार करून व शासन ठोस निर्णय न घेत असल्यामुळे तीन दिवशीय सम्पाचं हे पाउल उचलल्याची भावना याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केली. तसेच सरकारने आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास यापुढील काळात समनवय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोणतेही निदर्शने किंवा मोर्चा न करता सर्व संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये लालासाहेब मगर, बाळासाहेब घेवारे, धनाजी मुळे, बिलाल सौदागर,अविनाश मोकाशे, विक्रम मगतराव, शिवाजी साखरे, सुसेन सुरवसे ,राहुल गवळी,हुंडेकरी, दळवी, दुरुगकर, गायकवाड यांच्यासह शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.