लोहारा (इकबाल मुल्ला) :- 

      शिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीचा डाग पारधी समाजातील युवकांनी पुसून काढावा असे प्रतिपादन सह्याद्रि फाउंडेशन उस्मानाबादचे संस्थापक अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज यांनी केले.  
    उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील जयभवानी नगर मधील समाज मंदीरात सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद यांच्या वतीने येथील युवकांचा  प्रतिकूल परिस्थीवर मात करुन उच्च शिक्षणाकडे वाटचाल करीत असल्याबद्द्ल अजय दादासाहेब काळे व महेश दादासाहेब काळे यांचा व यांच्या आईवडीलांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी या समाजातील ढोकीचे सरपंचपदी निवड झाल्याबद्द्ल नानासाहेब चव्हाण तर गोपाळवाडी येथे पोलिस पाटील पिंटु मच्छिंद्र काळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन पं.स.सदस्य संग्राम देशमुख, माजी उपसरपंच अमर समुद्रे,आप्पा कांबळे,डी.एम. पाटील,पत्रकार अरुण देशमुख,मंगेश तिवारी,तानाजी माळी,पोलिस पाटील राहुल वाकुरे-पाटील,बालाजी सुरवसे,फारुक शेख,जालिंदर पवार,नाना सोनटक्के, मोहन ढवारे,बाळु मोरे,मारुती रोकडे,पिंटु कसबे, सुरज धाबेकर,निखिल जाधव,अदि उपस्थित होते.
     या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह्याद्रीचे कार्यकारी संचालक गजानन पाटील यांनी केले.या कार्यक्रमास महीला,युवक व ग्रामस्थ संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top