लोहारा (इकबाल मुल्ला) :-
लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील जि.प.प्रा.शाळेने तालुकास्तरीय शालेय क्रीडास्पर्धेत तिसऱ्यांदा यश संपादन केले आहे.या क्रीडास्पर्धेचे उदघाटन जि.प.सदस्या सौ.शितलताई राहुल पाटील यांनी यांनी केले. यावेळी प्रमुख म्हणुन सरपंच उज्वलाताई दंडगुले, उपसरपंच राम मिटकरी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजपाल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, उपाध्यक्ष बालाजी फुरडे, प्रतिष्ठित नागरिक बाबुसिंग राजपूत, मुख्याध्यापक राम मुसांडे, घोडके सर, तालुका संयोजक सोमवंशी सर आदी उपस्थित होते.
या व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटामध्ये मुले व मुली हे दोन्ही संघ जि.प.प्रा.शाळा तावशीगड विजयी झाले.तसेच 17 वर्षे वयोगटामध्ये बालाजी विद्यालय तावशीगडचे मुले मुली विजयी झाले व 19 वर्षे वयोगटात वि.वि.हायस्कुल अचलेर येथील मुलींचा संघ विजयी झाला. याच गटात भारत विद्यालय माकणी येथील मुलांनी बाजी मारली.
या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्रा.शाळा तावशीगड ने सलग तिसऱ्या वर्षी लोहारा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. या विजयी संघाला क्रीडाशिक्षक प्रविण ठाकूर, क्रीडाप्रमुख, साजीद मुजावर, मुख्याध्यापक राम मुसांडे ,माने सर, कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले. बालाजी विद्यालयाच्या यशासाठी क्रीडाशिक्षक गर्जे सर,घोडके सर यांनी मार्गदर्शन केले.
या विजयी संघाचे लक्ष्मण बिराजदार, बालाजी फुरडे, आर.पी.कांबळे, मधुकर कोळी,परतापूरे सर,जाधव सर,सगर सर,जाधव सर,माने सर, ओवांडकर सर, मक्तेदार सर,आर.बी.मुसांडे,जगताप मॅडम,राम मिटकरी आदींनी अभिनंदन केले.