![]() |
बाबुराव शेळके |
लोहारा (इकबाल मुल्ला) :-
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव बाबुराव सिद्धप्पा शेळके(वय 77)यांचे दुःखद निधन झाले.लातूर येथील खाजगी रुग्णालयात गांधी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने उचारादरम्यान दि.9 ऑगस्ट रोजी चार वाजता निधन झाले.ते मुळ मुरुम येथील शेळके गल्लीतील असून ते गेल्या 50 वर्षापेक्षा अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना मराठवाडा शिक्षक संघटना,उमरगा येथील भारत शिक्षण संस्था ते मुरुमच्या नगर शिक्षण विकास संस्थेत 1988 पासून कै.माधवराव (काका)पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,औसाचे आमदार बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील,जिल्हा बँकेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांच्या समवेत आजतागायत सचिव या पदावर कार्यरत होते.त्यांच्या वरती त्यांच्या मुळगावी मुरुम येथे दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नारळी मठात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात्य दोन मुले,तीन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.