तुळजापूर :- मराठा आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून तुळजापूर येथील सकल मराठा भगिनीनी बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी तुळजापूर तहसिलसमोर धरणे आंदोलन करुन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा सह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला.  
     प्रारंभी तुळजापुर शहरातील सर्व मराठा महिलांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येवून प्रथम छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
     या आंदोलनात सकल मराठा समन्वय समितीच्या तुळजापुर शहराच्या अध्यक्षा सौ मधुमती दुर्गादास अमृतराव, प्रा. शकुंतला अशोक मगर,  मिना सोमाजी, मुक्ता गवळी आदीसह शंभर ते दिडशे महिला सहभागी झाल्या होत्या. मराठा आरक्षणच्या मागण्या संदर्भात माहिलांचा आक्रोश या आंदोलनात पहावयास मिळाला. याप्रसंगी तहसिलदार यांना मराठा आरक्षण सह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.




 
Top