कळंब (भिकाजी जाधव) :- तालुक्यातील बारातेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेला गावचे सुपुत्र  बाळासाहेब पायाळ यांच्यावतीने वतीने लाऊड स्पीकर संच  भेट दिला आहे. 

समाजाचे आपण काही तरी देणे लागतो व ज्या शाळेतून आपण शिक्षण घेऊन मोठे झालो याची जाणीव ठेऊन उदांत हेतूने लाऊड स्पीकर संच भेट दिला आहे. जि प प्राथमिक शाळेला  डिजिटल झालेली असून विद्यार्थी पट वाढलेला आहे. गावातील विदयार्थी इंग्लिश स्कुलला न लावता पालकांनी गावातील शाळेला प्राधान्य दिले आहे. मुख्याध्यापक भोरे व सहशिक्षक गायकवाड हे शाळेची गुणवत्ता टिकवून आहेत. गावातील पालक जागरूक असून वेळोवेळी शाळेला भेट देतात. शाळेच्या अडीअडचणी सोडविण्याचा  प्रयत्न करत असतात. शाळेची प्रगती पाहुन बाळासाहेब  पायाळ  यांनी समाधान व्यक्त केले व १८ हजाराचा लाऊड स्पीकर संचट भेट दिला आहे. यामुळे विदयार्थी व्यासपीठावर बोलू शकणार आहेत.

        या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित सरपंच बाबुराव क्षीरसागर, शालेय समितीचे अध्यक्ष पोपट बाराते, अरुण बाराते, बाळासाहेब मुख्याध्यपक भोरे व सहशिक्षक गायकवाड पायाळ, अर्पुगा पायाळ, अरुण बाराते, बाळासाहेब बाराते, राजाभाऊ बाराते, रामेश्वर बाराते, बब्रुवान बाराते, मच्छिन्द्र  बाराते, रमेश बाराते, अरुण पायाळ, अंकुश बाराते यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top