नळदुर्ग :- सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील इटकळ ता. तुळजापूर येथे बुधवार रोजी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीनेमहामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, हजारो मेंढया रास्ता रोको मध्ये सहभागी करुन घेतल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरले.
धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे, चौंडीतील आंदोलकवरील गुन्हे मागे घ्यावेत, मुंबई येथील स्वदेशी मिलच्या जागेवर अहिल्यादेवी होळकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करावे, सोलापूर विदयापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव दयावे, अहमनगरचे नामकरण अहिल्यानगर असे करावे, या व इतर मागण्यासाठी तु्ळजापूर तालुक्यातील इटकळ येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रास्तो रास्ता रोको आंदोलन केले. दीड तास आंदोलन सुरु होते. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प झालेली होती. या आंदोलनात मेंढ्यांना रस्त्यावर आणून उभा करण्यात आले होते. 
       यावेळी माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, माळशिरस कारखान्याचे चेअरमन उत्तम जानकर, राम जवान, पदमाकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, गोपीचंद पडळकर, दयानंद चौरे, सुरेश कोकरे, सचिन घोडके, अरविंद पाटील, सोमनाथ गुड्डे, अरविंद घोडके, दिपक घोडके, उमेश काळे, श्रीमंत हाके, उमेश खांडेकर, संजय घोडके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनास आरपीआय, लहुजी शक्ती सेना, मुस्लिम संघटना आदी संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजिवन मिरकले यांना मागण्यांचे निवेदन दिले. विलास येडगे, विष्णू घोडके, अविनाश पाटील, सुहास येडगे, महादेव सोनटक्के, अमर भाळे यांच्यासह समाज बांधवानी पुढाकार घेतला.

      
 
Top