तुळजापूर  (दास पाटील) :-

अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील महेश गवळी यांची निवड झाली आहे. संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष जिवनराजे इंगळे यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र प्रदान केले. तुळजापूर येथील संभाजी महाराज पुतळ्याजवळ त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू महाराज कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष आमीरभाई शेख, काकासाहेब राऊत, शहराध्यक्ष कुमारतात्या टोले, नगरसेवक राहुल खपले, विद्यार्थी आघाडीचे प्रशांत अपराध, उमेश रोचकरी, बाळासाहेब गोरे, विष्णू भोसले, विनील जांभळे, अण्णासाहेब क्षीरसागर, औदुंबर जमदाडे, अॅड. दादासाहेब सोंजी, धैर्यशील कापसे, बापूसाहेब परदेशी, विजय भोसले, दत्ताजी सोमाजी, गोविंद पारवे, सुधाकर उकरंडे, अनिल आगलावे, लक्ष्मण कचरे, अनिल जाधव, सुनील पारवे, धैर्यशील नारायणकर आदींसह छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गवळी यांच्या निवडीबद्दल त्यांचे सामाजिक संस्था, संघटना यांच्यासह नागरिकांतून स्वागत होत आहे.
 
Top