लोहारा (इकबाल मुल्ला) :-
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) येथील जि.प.प्रा.शाळेत स्वतंत्र दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने 205 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
येथील शिवजन्मोत्सव समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहीत्य वाटपाचा अनोखा उपक्रम हाती घेतल्या मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब सोनटक्के होते.तर प्रमुख म्हणून उमेश थिटे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिराम जाधव उपाध्यक्ष मंगेश दळवे,सचिव शिवशांत काकडे,सुभाष पाटोळे,अमोल मोरे,संतोष बर्डे,महेश सावंत,किरण मोरे,अनिल पवार, महेश सूर्यवंशी,बबलू मोरे,गुरुनाथ खटके,गणेश गायकवाड,सागर सूर्यवंशी,दादा थोरे,श्रीकांत सूर्यवंशी, श्रीमंत पाटील,नंदकिशोर हजारे,सुरज पाटील,अदि उपस्थित होते. या कार्यक्रमास यांच्या विध्यार्थी,पालक शिक्षक,नागरीक मोठ्या संख्याने उपस्थित होते.