![]() |
तुकाराम राजाराम माने |
काटी :- तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे शनिवार दि. ( 18 ) रोजी सायंकाळी 6:30 वाजनेच्या सुमारास टु-व्हीलर व चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात काटी तुकाराम राजाराम माने वय (65 ) हे ठार झाले आहेत. एक गंभीर जखमी झाला असून जखमी अवस्थेत त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुळचे काटी येथील रहिवासी तुकाराम राजाराम माने वय (65) व बर्याच वर्षापासून (यमगरवाडी ता. तुळजापूर ) येथील एकलव्य विद्या संकुलात कामानिमित्त वास्तव्यास असलेले तुकाराम राजाराम माने हे काटी येथे शनिवारी सायंकाळी त्यांच्या नातेवाईकांना भेटून MH-13 A.7127 या त्यांच्या मोटारसायकलवरुन सायंकाळी 6:30 वाजनेच्या सुमारास सुरतगाव मार्गे सोलापूरकडे जात असताना रस्ता क्रॉस करताना सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडी क्रमांक MH-12-NU-2146 या गाडीने जोरदार धडक दिल्याने तुकाराम राजाराम माने वय
( 65 ) हे गंभीर जखमी झाले होते त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. .सायंकाळी साडेआठ पर्यंत तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद झाली नव्हती.
मृत तुकाराम माने यांचा अल्प परिचय
आज संध्याकाळी 6.30 वाजता सुरतगाव येथे झालेल्या अपघातात श्री तुकाराम राजाराम माने यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. ते मूळचे काटी येथील असून यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात काम करत होते. यमगरवाडी येथे विकसित झालेल्या सेवा प्रकल्पाचे 1996 सालापासून ज्यावेळी 10 विद्यार्थी आणि झोपडीमधून काम सुरुवात झाली त्यावेळेसचे तुकाराम अण्णा हे पहिले कार्यकर्ते होते. त्या झोपडीपासून ते आजच्या सुसज्ज अवस्थेपर्यंत झालेल्या प्रगतीचा प्रमुख शिलेदार आणि साक्षीदार होते. ते यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल, एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक सदस्य होते. त्यांच्या मृत्यूमुळे यमगरवाडीसह काटी येथे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तुकाराम माने यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.