“वेध तुळजापूर विधानसभेचे” या विशेष वार्तापत्रामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तुळजापूर विधानसभेसाठी युवा उमेदवार म्हणून पुढे आलेल्या नावापैकी माजी जि.प. अध्यक्ष तथा विदयमान सदस्य ॲड. धिरज पाटील यांच्या कार्याचा “तुळजापूर लाईव्ह” ने घेतलेला आढावा. ( कोण असेल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा युवा उमेदवार? हा यापूर्वीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - http://www.tuljapurlive.com/2018/07/blog-post_159.html )
ॲड. धिरज पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवत ग्रामीण भागातील विदयार्थिनीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रामीण भागात ई-लर्निंग शाळा सुरु करणे, दिव्यांगासाठी जयपूर फुट उपलब्ध करुन देणे अशा भरीव सामाजिक कामातून तुळजापूर तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सिंदफळ जि.प. मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आलेल्या ॲड. धिरज पाटील यांना त्यांचे वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हापरिषदेच्या 850 शाळा डिजिटल करत उस्मानाबाद सारख्या मागास जिल्हयात शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणला. तसेच महिलांना स्वावलंबी करण्यासाठी महिला बचत गटास तब्बल 13 कोटी रुपये कर्ज वाटप केले. नंदगाव व बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देत भव्य शालेय इमारत उभी केली. त्याचबरोबर 142 निम शिक्षकांना जिल्हापरिषदेच्या शाळेमध्ये रुजू करुन घेतले. ग्रामीण भागातील शालेय विदयार्थिनीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन ग्रामीण विदयार्थिनीच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिले. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सिंदफळ येथील मुदगलेश्वर मंदिरासाठी भरीव निधी देवून सभागृह, कुस्ती आखाडा व यात्रा काळात सुविधा उपलब्ध करुन दिल्या.
स्वर्गीय माणिकराव कदम-पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक दशकापूर्वी पासून ॲड. धिरज पाटील यांनी दिव्यांगाची सेवा करत जयपूर फुट उपलब्ध करुन दिले आहे. आतापर्यंत 2 हजार 500 लाभार्थी दिव्यांगाना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. याचाच भाग म्हणून दिव्यांगांना सायकल, वॉकरसह पुरक साहित्य वाटपाचा उपक्रमही आजतागायत सुरु आहे.
स्वर्गीय माणिकराव कदम-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई व एच.व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विदयमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप शिबीराच्या माध्यमातून 45 हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आले असून त्यामध्ये 3 हजार जणांना मोतीबिंदूचे निदान झाले. त्यापैकी 2 हजार रुग्णांची शस्त्रक्रिया केली. यामध्ये 1100 महिला लाभार्थी रुग्ण होत्या. सध्या तुळजापूर तालुक्यातील असंख्य रुग्ण या शिबीराचा लाभ घेत आहेत.
या लोकोपयोगी कार्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने युवा चेह-यास संधी दिल्यास ॲड. धिरज उर्फ कुलदीप कदम-पाटील यांचे नाव प्रकर्षाने समोर येत आहे.