बार्शी (गणेश गोडसे) :
मानव मुक्ती मिशनच्या वतीने आज बार्शी येथे आढावा बैठक व नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक परिषदेच्या नविन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी धिरज शेळके, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नारायण माने, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी नवले, बार्शी तालुका अध्यक्ष उमाकांत राजमाने, तालुका उपाध्यक्ष पदी बिरप्पा तुपे यांची नियुक्ती करून त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मानव मुक्ती मिशनचे संसद प्रमुख नितीन सावंत, प्रदेशाध्यक्ष ॲड. निंबाळकर, भगतसिंग स्टुडन्ट फ्रंटचे प्रदेशाध्यक्ष राम सरनाईक, मानव मुक्ती मिशनच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नूरजहाँ शेख, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इस्माईल तांबोळी, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष महेश ठोंगे, बार्शी तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड, वारकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अंगद बारसकर आदी उपस्थित होते.

 
Top