बार्शी (गणेश गोडसे) :-
ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या श्रावणमास प्रवचन मालेस ग्रामदैवत भगवंत मंदिराच्या आवारात येत्या १२ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे.हि प्रवचनमाला सांयकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होणार आहे.भगवंत देवस्थान समिती आणि बोधराज मित्र मंडळ याच्या सयक्त विद्यमाने होत असलेल्या या प्रवचन मालेचे हे १६ वे वर्ष आहे. या वर्षी ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, श्रीकृष्ण चरित्र चिंतन या विषयावर एक महिना प्रवचने देणार आहेत.
ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांनी गेल्या १५ वर्षात संत ज्ञानेश्वराचा हरिपाठ,संत तुकाराम गाथा, संत मुक्ताईचे ताटीचे अभंग, संत एकनाथी भागवत, नारदीय भक्तीसुत्र, विष्णु सहस्रनाम, कर्मयोग,भक्तीयोग, दैवी संपत्ती, संत नामदेव चरित्र, ज्ञानेश्वरीतील भावकथा, आध्यात्म रामायण, संत माणकोजी महाराज चरित्र, चांगदेव पासष्ठी या विषयांवर प्रवचने दिली आहेत. बोधले महाराज यांनी विधीशाखा व तत्वज्ञान विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सध्या ते ज्ञानंतर भक्ती या विषयावर प्रबंध लेखन करत आहेत. बोधले महाराज हे धामणगाव येथील संतश्रेष्ठ माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज आहेत. क्षीपी सिध्दांत आणि मार्मिक दृष्टांत सांगत रसाळवाणी मध्ये प्रवचने देणा-या बोधले महाराजांचा वागयज्ञ सोहळा म्हणजे भाविकांसाठी  श्रवणानंदाच्या अमृतयोगाची महापर्वणीच आहे.
 
Top