बार्शी (गणेश गोडसे) :-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खामगांव ता.बार्शी येथील माध्यमिक आश्रमशाळेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या आश्रमशाळेतून एकुण १८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले त्यापैकी ०५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. स्वप्नील सुरेशचंद्र जाधवर याने २९६ पैकी २६२ मार्क मिळवून राज्याच्या ग्रामीण विभागात चौथा येण्याचा मान पटकाविला. संदीप माळी याने २०८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ७९ वा कु. मुळे समिक्षा हिने २०२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १०७ वा क्रमांक, कु. थिटे साक्षी हीने २०० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ११९ वा क्रमांक तर मोरे संकेत यांने १९४ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १४४ वा क्रमांक पटकाविला.१८ विद्यायपैिकी १४ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले या गुणवंत विद्यार्थ्यांना श्री.वाघमारे सर, काशीद सर, दळवी सर, श्रीमती देशमुख मॅडम त्याचप्रमाणे वाकुरे सर, काटे सर, भोंडवे सर, आगवणे सर, श्रीमती पाटील मॅडम, साबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राथमिक आश्रमशाळा, खामगाव फेब्रुवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परिक्षेत प्राथमिक आश्रमशाळा खामगाव या शाळेचे सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले असून शाळेने शिष्यवृत्ती परिक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.
पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत कु.मनस्वी मनोज गादेकर हिने ३०० पैकी २६६ गुण मिळवून राज्यात गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक मिळवला तर प्रवण रावसाहेब मोरे यांनी ३०० पैकी २४८ गुण ,कु.साक्षी कैलास मडके ३००पैकी २४२ गुण ,कु.शर्वरी अजय चौधरी ३००पैकी २३८ गुण कु.समृध्दी शैलेश देवकर ३००पैकी २३२गुण ,प्रणव सुधाकर कोळी ३००पैकी २१८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत असे घवघवीत यश मिळवून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक मोरे एस.बी., झांबरे के.एस.,आर.एम.मोरे ,धावडे आर.एम.,गादेकर पी.बी. यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थापक प्रभाकर डमरे, अनिल मुळे, विनोद काटे तसेच मोरे एस.बी,धावडे आर.एम, गादेकर पी.बी.,मुख्याध्यापक प्राचार्य डमरे, मुख्याध्यापक उपरे, तांबडे आदींनी केला.