नवी दिल्ली :- काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे आज (दि. 22 ऑगस्ट) रोजी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. चाणक्यपुरी येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते.
गुरुदास कामत दोनदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांत त्यांचं प्राबल्य होतं. गुरुदास कामत यांनी मुंबईत काँग्रेसला मोठं करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते. काँग्रेसने कामत यांच्याकडे राजस्थान, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दिव दमन या राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या वर्षी कामत यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता.