तुळजापूर :- मंगरूळ ता. तुळजापूर येथील सन  अँड ओशन कंपनीचा १७  वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आयएसओ नामांकन प्राप्त असलेल्या सन अँड ओशन कंपनी च्या माध्यमातून शेकडो कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध झाला असून आजवर या  कंपनीने शेती पुरक दर्जेदार उत्पादने बनवून देशात नावलौकिक कमवले आहे. 


या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मातोश्री श्रीमती विमलबाई भानुदासराव धुरगुडे यांच्या हस्ते कंपनीच्या कामगारांगा भेट वस्तु देण्यात आल्या.  यावेळी  सन अँड ओशन कंपनीचे संचालक तथा जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, शैलेश धुरगुडे, कंपनीचे मॅनेजर किसवे साहेब यांच्यासह कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top