उस्मानाबाद :- इंडियन मेडिकल असोसिएशन (लेडीज विंग) व स्लीम लेडीज फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर गुरूवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता शहरातील स्लीम लेडीज फिटनेस क्लब (उंबरे कोठा) येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील तज्ज्ञ महिला डॉक्टरांकडून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
आरोग्याविषयी महिलांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन लेडीज विंग आणि स्लीम लेडीज फिटनेस क्लबच्या वतीने केवळ महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तगट,रक्तदाब, शरीरातील चरबी, मधुमेह आदी प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहेत. शिबिरानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. शिबिरात केवळ महिला डॉक्टर तपासणी करणार आहेत. शिबिरापूर्वी महिलांनी नाव नोंदणी(संपर्क 8007800741) करावी, तसेच जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ.स्मिता शहापूरकर, सेक्रेटरी डॉ.श्रध्दा मुळे, स्लीम लेडीज फिटनेस क्लबच्या सुजाता देशमुख, ऋतुजा देशमुख यांनी केले आहे