उस्मानाबाद :- तालुक्यातील बेंबळी येथे मंगळवार दि. 21 ऑगस्ट रोजी बेंबळी जि.प. गटातील काँग्रेस कार्यकर्ता व बुथ कमिटी मेळावा तुळजापूर तालुक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. यावेळी आ. चव्हाण यांनी जि.प.गटातील प्रत्येक गावातील बुथ सदस्यांची माहिती घेऊन आगाती निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी जि.प.चे माजी अध्यक्ष तथा विदयमान सदस्य ॲड. धिरज पाटील, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, सत्तार शेख, युवक प्रदेश सचिव जावेदृ काझी, जिल्हा सरचिटणीस नितिन बागल, युवक उपाध्यक्ष रोहित पडवळ, मुन्ना इंगले, दर्शन कोळगे, अमर माने, सलमान शेख, किसनसेल तालुकाध्यक्ष नागनाथ बोरगावे, राजेंद्र नळेगावकर, सुभाष हिंगमिरे, बालाजी माने, धनंजय माने, भुजंग दळवे, पं.स.सदस्य आश्रुबा माळी, नंदु क्षिरसागर, विवेकानंद सोनटक्के, बालाजी बंडगर, इकबाल शेख यांच्यासह बेंबळी जि.प. गटातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top