उस्मानाबाद :- तालुक्यातील रुईभरचे सुपूत्र व कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या चव्हाण बंधूच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

विनोद वसंतराव चव्हाण व मनोज वसंतराव चव्हाण हे मुळचे तालुक्यातील रुईभर येथील असून सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. सामाजिक बांधीलकीतून त्यांनी स्वातंत्र्यदिनी म्हणजे काल दिनांक १५ ऑगस्ट रोजी रुईभर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना स्वूâल बॅग तसेच इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आगामी काळात याच शाळेत ई - लर्निंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस असून याकामी गावातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. याकामी माजी सैनिक ग्रुप तसेच अमोल चव्हाण, भगिरथ लोमटे, राजाराम कोळगे, शाळेचे मुख्याध्यापक नाडे सर आदिंचे मोलाचे सहकार्य लाभले. चव्हाण बंधू यांच्या या कार्याचे ग्रामस्थामधून कौतूक होत आहेत.

 
Top