बार्शी( गणेश गोडसे) :
पिंपरी (सा) ता. बार्शी येथील अविनाश भास्कर काशीद राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी शालेय शिक्षण घेत असताना विविध स्कॉलरशीप परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण केली. 
दोन महिन्यापूर्वी इंग्रजी विषयातून ते SET परीक्षा देखील उत्तीर्ण झाले आहेत. एकाच वर्षी इंग्रजी विषयातून SET आणि NET परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी वेगळाच शिक्षण क्षेत्रात इतिहास निर्माण केला आहे. मुंगशी (आर) येथे सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत शिक्षक म्हणून कार्य करीत असताना एक उपक्रमशील शिक्षक म्हणून आपला शिक्षण क्षेत्रात वेगळाच ठसा निर्माण केला आहे. या यशाबद्दल मित्र परिवार, शिक्षक बांधव, पिंपरी ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

 
Top