बार्शी (गणेश गोडसे) :
जावयाकडे वारंवार पैशाची मागणी करूण तसेच त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जावयास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरा, सासु, मेव्हणा, मेव्हणी व पत्नीव  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सासरे अजिनाथ महादेव कांबळे, सासु मंगल अजिनाथ कांबळे, मेव्हणा भैरू अजिनाथ कांबळे, मेहुणी मनिषा हावळे सर्व रा. कात्राबाद ता.परंडा जि.उस्मानाबाद व पत्नी शामल संपत शिं  अशी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. संपत शिंदे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. भिमराव बापु शिंदे वय 70 रा.बाभुळगाव ता.बार्शी यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
शिंदे यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि त्यांचा मयत मुलगा संपत याचा विवाह 20 एप्रिल 2017 रोजी कात्राबाद येथील अजिनाथ कांबळे यांची मुलगी शामल हिच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून पहिले दोन महिने झाल्यानंतर सासरची मंडळीं मयतास फोन करून पैशाची मागणी करत असत व पैसै न दिल्यास पत्नी शामल ही माहेरी निघुन जाण्याची धमकी देत असे व सतत भांडणे काढत असे. संपत याने गावातील लोकाकडुन उसने पैसे घेवन त्याचे सास-यांना दिले होते.सासरची मंडळी ही सतत त्यांच्या घरी येवून संपन यास पैशाची मागणी करून भांडण करीत होते.
     त्यानंतर मागील ४ महिण्यापूर्वी पैसे दिले नाहीत म्हणून शामल हिस माहेरी घेवून गेले. त्यानंतर मुलगा संपत यास शामल हिने फोन करुन सांगीतले की तुम्ही मला घेवून जावा असे सांगितल्यावर तिला बाभुळगाव येथ आणण्यात आले. त्यानंतर ती काहीही कारणावरून घरात भाडण करत असे व तिचे माहेरील लोक हे आपण आता त्याचेकडून नोटरी लिहुन घेतले आहे ते काही करू शकत नाहीत म्हणून मानसिक त्रास देत असत. दि. २७ जुलै २०१८ रोजी घरात परत भाडण झाल्याने शामल हिने माहेरील लोकाना बोलावून घेऊन पोलिस ठाण्यात गेले. त्यांचे भांडण आपआपसात मिटल्याने शामल हे दोन दिवस माहेरी राहुन येते असे म्हणुन निघुन गेली. दरम्यान सासरे अजिनाथ महादेव कांबळे यांनी संपत यास तु बार्शीच्या बाहेर ये तुला जिवच मारतो म्हणुन धमकी दिली. त्यानंतर संपत भिमराव शिदे याने २९ जुलै २०१८ रोजी मध्यरात्री सासरच्या त्रासास कंटाळून किरण शिंदे यांचे शेतातीर झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 
संपत भिमराव शिदे याचे लग्न झाल्यापासुन त्यास त्याचे सासरे, सासु, मेव्हणा, मेहुणी, पत्नी यांनी वारंवार पैशाची मागणी करुन, त्यास मानसिक त्रास देऊन मारण्याची धमकी देवुन,त्याचे सोबत भांडन करुन त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे हे करत आहेत.

 
Top