बार्शी (गणेश गोडसे) :
घरी कोणी नसल्याची संधी साधुन भर दिवसा दोन घरे फोडुण सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट असा 1 लाख 10 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकणी बार्शी शहर पोलिसांनी लातूर येथुन दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन अटक केली& असुन दोघांना आज बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांना तिन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. वाजिद उस्मान शेख वय 28 रा.मलिकपुरा,परळी वैजिनाथ जि.बिड हल्ली रा.लालबहाद्दूर शास्त्री नगर लातुर व सत्तार बाबामीया सय्यद वय 55 रा.लालबहाद्दूर शास्त्री नगर लातुर अशी चोरी प्रकरणी अटक करूण पोलिस कोठडी देण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, हवालदार अमोल माने, चंद्रकांत आदलिंगे, श्रीनिवास दासरी, सहदेव देवकर, सचिन आटपाडकर, अभय उंदरे यांच्या पथकाने केले.
दिनांक 23 जुलै 2018 रोजी भर दिवसा जमदाडे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुण आत प्रवेश करूण दहा ग्रॅम व पाच ग्रॅम वजनाच्या  40 हजार रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या, व 1 लेडिज 5 ग्रम वजनाची पिवळ्याची अंगठी, 30 हजार रूपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाचे फुले झुबे व कर्णवेल,लहान मुलाचे वाढदिवसाला आलेले बदाम,अंगठ्या व चैन असे मिळून 5 ग्रॅम वजनाचे असे एकुण 35 ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातुची सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते.
तसेच शिवाजी सोपान लोखंडे रा. राऊत प्लॉट, बार्शी यांच्या देखील बंद घराचे कुलुप तोडुन घर उघडुन आता प्रवेश करुन लोखंडी कपाट उचकटुन कपाटातील रोख रक्कम सोने व मोबाईल चोरुन नेले होते. चोरट्यांनी रोख रक्कम 30,000 रूपये, 5ग्रॅम वजनाची 10 हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी व 1 हजाराचा मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 1,11,000 रूपयाचा माल चोरून नेला होता. संजय राम जमदाडे वय 32 रा. जामगाव रोड, राऊत प्लॉट बार्शी या हॉटेल व्यावसायीकाने याबाबत बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली होती. 
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलिसांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने व सदरचे आरोपी हे लातूर येथे असल्याने शहर पोलीस पथकाने दोघांना तेथुन ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता गुन्हा केल्याचे कबुल केले.दोघांना घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे शहरातील अनेक चोरीचे गुन्हे उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधिक तपास बार्शी पोलिस करत आहेत.

 
Top