नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, असे पत्र अमित शहा यांनी विधि आयोगाला लिहिल्याने लोकसभेबरोबरच महाराष्ट्र व अन्य 13 राज्यांच्या विधानसभा  निवडणूका एकत्र घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. मध्यप्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांची मुदत यंदा संपत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्टोबर 2019 मध्ये संपले, पण काही ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करून, तर काही राज्यांत विधानसभा आधीच बरखास्त करून तेथील विधानसभा निवडणुका लोकसभेसह व्हाव्यात, अशी भाजपाची इच्छा आहे. किमान भाजप व रालोआशासित राज्यांत असे करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाल्याचे एका नेत्याने सांगितले.
 
Top