जळकोट :- तुळजापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे यांची महाराष्ट्र यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलाजे ,विठ्ठल सुतार ,बालाजी पालमपल्ले ,महादेव सुतार आदीजण उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मुळ प्रश्नावर उत्तर शोधून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आपण काम करू अशी ग्वाही यावेळी सत्यवान सुरवसे यांनी दिली.