नवी दिल्ली : कवी, साहित्यिक आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. 11 जून रोजी त्यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या 36 तासांपासून त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. उपचारादरम्यान त्यांनी आज सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरात अनेक ठिकाणी प्रार्थना करण्यात आल्या होत्या. वाजपेयी यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते. ते किडनी विकाराने सुद्धा त्रस्त आहेत.
साभार - दै. पुढारी