तुळजापूर :- राज्यातील भाजप सरकार धनगर समाजास आरक्षणाच्या बाबतीत दिरंगाई करीत असल्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी वास्तव्यास असलेल्या श्री क्षेत्र तुळजापुरातून गुरुवार दि. 16 ऑगस्ट रोजी तुळजापूर ते चौंडी (राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव, जि. नगर)  "भाजप सरकार चलेजाव" म्हणत पायी पदयात्रेस प्रारंभ करण्यात आले आहे. या पदयात्रेत हजारो धनगर समाज बांधव मेंढयासह सहभागी झाले आहेत. 

तुळजापुरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पूजन करुन श्री तुळजाभवानी मंदिरातील छत्रपती शाहू महाराज महाद्वारासमोर धनगर समाज बांधवांनी जागरण गोंधळ घातला. त्यानंतर बार्शी, करमाळा मार्गे राज्यमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी जि. अहमदनगर कडे पदयात्रा रवाना झाली.

यावेळी धनगर कृती समिती मोर्चाचे अध्यक्ष सुरेश कांबळे, पुण्याचे माजी आमदार प्रकाश शेंडगे, राष्ट्रवादीचे युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, डॉ. भिसे, माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, ॲड. खंडेराव चौरे, उमेश खांडेकर, शहाजी हाके, सोमनाथ गुड्डे, राम जवान, किशोर  लकडे, बालाजी बंडगर, दत्ता बंडगर, प्रभाकर घोडके, दयानंद चौरे, ज्ञानेश्वर घोडके, विलास येडगे, अमर भाळे, मारुती घोडके, अमर शेंडगे, सुहास येडगे, पदमाकर घोडके यांच्यासह हजारो मराठवाडयातून  धनगर समाज बांधव उपस्थित होता.

 
Top