तुळजापूर :- महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे, असे सांगून वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगरसेवक सुनिल (पिंटू) रोचकरी यांचे कौतुक करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा "तुझं माझं ब्रेकअप" फेम अभिनेत्री केतकी चितळे यांनी तुळजापूर येथे दिले.
तुळजापूर येथील नगरसेवक सुनिल (पिंटू) रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त व नागपंचमीनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिराजवळ होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री केतकी चितळे या उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिला वर्गाना चितळे हे मार्गदर्शनपर बोलत होत्या. स्पर्धेतील विजेत्या महिला स्पर्धकांना अभिनेत्री चितळे, सुनिल रोचकरी, सौ. प्रियंका सुनिल रोचकरी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सरस्पती दिलीप करंडे ह्या प्रथम आल्याने त्यांना मोबाईल, पैठणी साडी असे पारितोषिक देण्यात आले. तर द्वितीय स्वाती कावरे यांना सोन्याची नत व पैठणी, तृतीय क्रमांत रुपा नितीन अग्रवाल यांना मिक्सर व पैठणी साडी, तर उत्तेजनार्थ अश्विनी हिरोळीकर यांना डिनरसेट व पैठणी देण्यात आली. लकी ड्रा कुपनमधून सहाशे महिलांनी सहभागी नोंदविल्या. 20 महिलांना डिनर सेट भेट देण्यात आले. खेळात सहभाग घेतलेल्या महिलांना 100 वस्तू देण्यात आल्या.
तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील रोहिनी माने हिचा लिड रोल असलेला चित्रपट "रोल नंबर 18" या चित्रपटाचे प्रमोशन या कार्यक्रमात रोहिनी माने यांनी केले. निवेदक म्हणून सिनेअभिनेते रमेशदादा परळीकर यांनी केले. त्यांनी मराठी, हिंदी गाणी, विनोदी उखाणे, नृत्य, मनोरंजक खेळ यासोबत अनेक कलाविष्कार सादर केले.
या कार्यक्रमासाठी सुनिल चव्हाण विचार मंच तर्फे पैठणी देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी अमृतराव, दत्तात्रय कदम, सचिन सुरवसे, योगेश चव्हाण, किरण पाठक, पुरंजन कोंडव, प्रशांत दराडे, प्रेम प्रयाग, सोमनाथ अमृतराव, शरद रोचकरी, धिरज कदम, विनोद सोंजी, सुहास गायकवाड, अजित क्षिरसागर, प्रतिक प्रयाग, किशोर भय्ये, गिरीराज लसणे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास महिला वर्गाची मोठी गर्दी होती.