सोलापूर :- जागरूक पालक आणि मुलांच्या उत्सुक प्रश्नांना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणारे आधुनिक तंत्रज्ञान आय कियु आणि ईक्यू  चा समतोल साधण्यासाठी ईझीकनेक्ट किट तयार करण्यात आले आहे. लहान वयात मुलांना मोबाईल व कॉम्प्युटर असणाऱ्या सवयी मोडण्यासाठी हे इलेक्ट्रॉनिक किट तयार करण्यात आले आहे. सोलापूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल होत असताना या ईझीकनेक्ट किट चे प्रथमच विद्यार्थ्याना हाताळण्यास मिळणार आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थान कार्यालयात ईझीकनेक्ट किट उद्घाटनाप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी बोलत होते. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी के देशमुख यांचा सत्कार सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले. यावेळी श्रेयस आळंद, बाळासाहेब भोगडे, विश्वनाथ लब्बा, गिरीश गोरनळ्ळी, शिवकुमार पाटील, क्लेवटो टेक्नॉलॉजीचे सागर देशपांडे, स्मार्ट सिटीचे नरेंद्र काटिकर, ओंकार दाते, शुभदा कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते. 

    २००७ मध्ये आय आय टी मध्ये दाखल केलेल्या पेपरचा उल्लेख देऊन लेखी व तोंडी या मधिल गॅप ईझीकनेक्ट भरून काढेल. अभियांत्रिकीचा अभ्यासाची सुरुवात लहान वयापासून केल्यास आपला देश महासत्ता बनेल असे डॉ. देशमुख बोलत होते. इलेक्ट्रॉनिकच्या जगाशी मुलांची ओळख व्हावी आणि हसत खेळत मुलांनी इलेक्ट्रॉनिक किट हाताळता यावे असे या मागचा उद्देश आहे. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस आळंद आणि आभार प्रदर्शन दिपक केरकळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर देशपांडे, प्रसाद कुटेमाटे, दिपक केरकळ, स्नेहल पवार, प्राजक्ता कलबुर्गी, पुष्कराज मेत्री यांनी काम पाहिले.

 
Top